S M L

'आप'ने केलं पवारांना लक्ष्य, 22 हजार कोटींचा वीज घोटाळ्याचा आरोप

Sachin Salve | Updated On: Feb 20, 2014 06:51 PM IST

'आप'ने केलं पवारांना लक्ष्य, 22 हजार कोटींचा वीज घोटाळ्याचा आरोप

anjali damaniya 4320 फेब्रुवारी : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून आरोप-प्रत्यारोपाच्या खेळीला सुरूवात झालीय. आम आदमी पार्टीने आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलंय.

अजित पवार ऊर्जा मंत्री असताना राज्यात 22 हजार कोटी रुपयांचा वीज घोटाळा झाल्याचा आरोप आपच्या सदस्या अंजली दमानिया यांनी केला. कमी दरात उपलब्ध असलेला कोळसा वापरण्याऐवजी वीज निर्मितीसाठी महागडा आयात केलेला कोळसा वापरला जातो. राज्यात 18 लाख मीटर नसलेले कनेक्शन आहे.

त्यातून आमदारांचे फार्म हाऊस, त्यांच्या शैक्षणिक संस्था, साखर कारखाने फुकटात वीज लाटत असल्याचा आरोपही त्यांनी केला. घोटाळ्यातलं नुकसान भरून काढलं तर वीज 50 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकते असा दावाही त्यांनी केलाय.

आम आदमीच्या पक्षाच्या मागण्या

  • कोळशाच्या गुणवत्तेचं आणि किती कोळसा वापरला जातो याचं ऑडिट व्हावं
  • आयात कोळसा वापरणं ताबडतोब थांबवा
  • महाजेनकोनं त्यांना पुरवला जाणार्‍या कोळशाचा योग्य वापर करावा
  • वीजप्रकल्प संपूर्ण क्षमतेनं चालवावेत
  • वीज विकत घेण्याबाबतचे करार पारदर्शक असावेत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2014 06:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close