S M L

डॉ.तात्याराव लहानेंच्या अटकेला स्थगिती

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2014 11:17 PM IST

डॉ.तात्याराव लहानेंच्या अटकेला स्थगिती

21 फेब्रुवारी : मुंबईतील जे.जे.रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने अडचणीत आले आहेत. जातीवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे डॉ. लहाने विरुद्ध कामगार असा वाद सध्या जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये पेटलाय.

डॉ लहाने यांना 25 फेब्रुवारीपर्यंत अटक करता येणार नाहीये. लहानेंच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी 25 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार लहानेंना अटक करता येणार नसली तरी त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत जे जे रुग्णालयात जायला मनाई करण्यात आलीय.

जे जे रुग्णालयातल्या बदली कामगारानं डॉ. लहानेंवर आरोप केले आहेत. याबाबत युनियन आणि कर्मचार्‍यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, वेगवेगळी मतं पुढे येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात डॉ. तात्याराव लहानेंना गोवलं तर जात नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2014 08:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close