S M L

मार्क्सवादी नेते प्रभाकर संझगिरी यांचं निधन

10 मार्च मुंबईज्येष्ठ मार्क्सवादी नेते प्रभाकर संझगिरी यांचे सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईत निधन झालं. प्रभाकर संझगिरी सीटू या ट्रेड युनियनच्या महाराष्ट्र विभागाचे प्रमुख होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस पदही त्यांनी भूषवलं होतं. कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल कमिटीचेही ते सदस्य होते. आणिबाणीनंतरची म्हणजेच 1977 ची विधानसभा निवडणुकही त्यांनी जिकली होती, ते विधान परिषदेचे सदस्यही होते. विज्ञाननिष्ठ असलेल्या संझगिरी यांनी सीपीएमच्या जीवनमार्ग या मुखपत्राच्या संपादक पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. तसंच त्यांनी होमी भाभा यांच्या बरोबर काही काळ संशोधनही केल होतं. अणुचे अंतरंग हे संझगिरींचं पुस्तक गाजलं होतं. चार्वाक ते मार्क्स आणि मानवाची कहाणी ही त्यांची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. आज दुपारी एक वाजल्यापासून भांडुपच्या सीटू ऑफीसमध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर भांडुप स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2009 06:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2009 06:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close