S M L

शिवसेना-भाजपमधला जागा वाटपाचा घोळ कायम

10 मार्च मुंबईनऊ हा आकडा शिवसेना - भाजप युतीचे नेते चांगला आकडा मानतात. त्यामुळे नऊ मार्चला दोन्ही पक्षांचं जागावाटप होईल असं भाजप नेत्यांना वाटत होतं. पण शिवसेनेचे नेते दरवेळी नवा मुद्दा काढतात आणि तोडगा निघाला असं वाटत असताना जागा वाटपाचा घोळ लांबतो.सोमवारी भाजप-सेनेच्या जागावाटपाच्या संदर्भात नितीन गडकरींच्या मुंबईतल्या वरळी इथल्या घरी बैठक झाली. ह्या बैठकीत जागावाटपावर काहीतरी तोडगा निघेल अशी शक्यता होती. पण ही बैठक कुठल्याही निर्णयाविनाच संपली आणि जागावाटपाचा घोळ कायम राहिला. कल्याणच्या बदल्यात मनोहर जोशींनी भिवंडी देण्याचं भाजपला कबूल केलं. परंतु त्यानंतर बैठकीत सुभाष देसाई आले आणि त्यांनी ते नाकारलं. त्यामुळे मनोहर जोशींची गोची झाली. अजूनही यवतमाळ-वाशिम, जळगाव, कल्याण आणि दक्षिण मुंबई या जागांबाबत निर्णय होत नसल्याचं सूत्रांकडून समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2009 06:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2009 06:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close