S M L

दादा-बाबांनी महाराष्ट्राचा बिहार केला : गोपीनाथ मुंडे

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2014 12:23 PM IST

Image mahayuti54633_300x255.jpg24 फेब्रुवारी :  'राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू,’ या घोषणेचे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी डोंबिवलीमध्ये रविवारी झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत पुनरुच्चार केला. राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असून वाळू, तेल, दूध, पाणी माफिया सर्वत्र निर्माण झाले आहेत. दादा-बाबा-आबा यांनी महाराष्ट्राचा बिहार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे दोन नेते आठ दिवसात महायुतीत येणार असून राज्यात महायुती लोकसभेच्या 35 जागा जिंकेल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. ज्यांनी मंत्रालय जाळलं त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे सांगून आघाडी शासन कुछ दिन की मेहमान है, असा इशारा मुंडे यांनी दिला.

पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार गद्दारांचे नेते - उद्धव ठाकरे

‘माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, सोनिया गांधी यांच्याही पाठीत शरद पवार यांनी खंजीर खुपसला. राष्ट्रवादी काँग्रेस ही गद्दारांची पार्टी असून पवार गद्दारांचे नेते आहेत’, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वाभाडे काढले. शरद पवारच मोठे गद्दार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांची औलादही तशीच निपजणार, असे म्हणत राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झालेले ठाण्यातील शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांचाही त्यांनी समाचार घेतला. अभिनेता संजय दत्तच्या पॅरोलवर उद्धव यांनी आसूड ओढले.

पुतण्याला सोन्याची अंडी, शेतकर्‍यांना इमूची अंडी! - रामदास आठवले

पवार यांनी स्वत:च्या पुतण्याला सोन्याची अंडी दिली आणि शेतकर्‍यांना मात्र बिनकामाची इमूची अंडी दिली. गेली 12 वर्षे धूळ खात पडलेला सावकारी कायदा निवडणुकीच्या तोंडावर मंजूर करण्याचा आघाडी शासनाचा प्रयत्न म्हणजे निर्वाणाआधीची धडपड असून महागाईने राज्यातील त्रस्त जनता त्यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही मुंडे यांनी केला. पाकिस्तानची सीमेवरील आगळीक खपवून घेतल्याबद्दल पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर भाजपच्या विनोद तावडे यांनी टीका केली. एनडीएची सत्ता आल्यानंतर भारतीय संविधान बदण्यात येईल, हा प्रचार धांदात खोटा असून काँग्रेस अधिक जातीयवादी असल्याचा आरोप रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2014 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close