S M L

राज्याच्या लेखानुदान अधिवेशनाला 'वादळी' सुरुवात, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2014 12:47 PM IST

राज्याच्या लेखानुदान अधिवेशनाला 'वादळी' सुरुवात, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

vadali adhivesh24 फेब्रुवारी :   माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर ‘आदर्श’प्रकरणी गुन्हा दाखल करावा, राज्य एलबीटी आणि टोलमुक्त करावे, तसेच आघाडी शासनातील 16 भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करावी, याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत राज्यपालांचे अभिभाषण रोखून धरण्याचा निर्णय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल जाहीर केलं होतं.

राज्य सरकारच्या लेखानुदान अधिवेशनाची सुरूवात गदारोळानं झाली. राज्यपालांच्या अभिभाषणात विरोधकांनी अडथळे आणले. त्यांच्या सबंध भाषणादरम्यान विरोधक घोषणाबाजी करत होते. काही वेळानं विरोधक हौद्यात उतरले आणि तिथून घोषणाबाजी करायला त्यांनी सुरूवात केली. 'राज्यपाल घरी जा' अशा घोषणा विरोधक यावेळी देत होते.

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. 'जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करायचं आश्वसन आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणात अडथळे आणण्याचा निर्णय मागे घेणार नाही' असं विरोधकांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी आयोजित केलेल्या चहापानावरही त्यांनी बहिष्कार घातला. तसंच राज्याच्या आर्थिक नियोजनाची श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणीही करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2014 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close