S M L

शिवसेना मुर्दाडांचा पक्ष, उद्धव ठाकरे मुर्दाडांचे नेते -मलिक

Sachin Salve | Updated On: Feb 24, 2014 11:27 PM IST

235 malik on udhav24 फेब्रुवारी : शिवसेना हा मुर्दाडांचा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे हे मुर्दाडांचे नेते आहेत असं सणसणीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलंय.

तसंच उद्धव म्हणता आम्ही गोवारी हत्याकांड विसरलो नाही पण महायुतीत असलेले आरपीआयचे नेते रामदास आठवले रमाबाई हत्याकांड विसरले आहे, पण महाराष्ट्राची जनता हे विसरलं नाही. येणार्‍या निवडणुकीत त्यांनी त्यांची जागा दाखवेल असंही मलिक म्हणाले.

रविवारी डोंबिवलीमध्ये महायुतीची सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली होती. शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता एवढंच नाही तर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतही ते असेल वागले. त्यामुळे राष्ट्रवादी ही गद्दारांची पार्टी असून पवार हे गद्दारांचे नेते आहे अशी विखारी टीका उद्धव यांनी केली होती.

उद्धव यांच्या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं. शिवसेना हा मुर्दाडांचा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे हे मुर्दांडांचे नेते आहेत असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलंय. मलिक यांनी वापरलेल्या भाषेमुळे सेनेचे नेते संतप्त झाले. माणसानं आपली लायकी बघून बोलावं, शिवसेनाही आग आहे आमच्या नादी लागाल तर जळून खाक व्हाल असं शिंदे म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2014 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close