S M L

आशिया कपला आजपासून सुरुवात; बुधवारी रंगणार भारताचा पहिला सामना

Samruddha Bhambure | Updated On: Feb 25, 2014 11:02 AM IST

आशिया कपला आजपासून सुरुवात; बुधवारी रंगणार भारताचा पहिला सामना

aisa cup25 फेब्रुवारी : परदेशात झालेल्या मानहानिकारक पराभवांनंतर टीम इंडिया आता भारतीय उपखंडात परतलीये. मंगळवारपासून बांगलादेशमध्ये एशिया कपला सुरुवात होतं आहे.  भारताचा पहिला सामना 26 फेब्रुवारी रोजी म्हणजेचं बुधवारी रंगणार आहे. महेंद्रसिंग धोणीच्या अनुपस्थितीत कॅप्टन कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियापुढे स्वत:ला सिद्ध करण्याचं एक मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन परदेश दोर्‍यात टीम इंडिया विजयाविनाच परतली आहे. या खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाला वन डे रँकिंगमध्येही बसला आहे. भारताला नंबर वनचं स्थान गमवावं लागलं. इतकंच नाही तर टीम इंडिया गेल्या 12 वन डेमध्ये विजय मिळवू शकली नाही, त्यामुळे विजयाचा हा दुष्काळ टीम इंडिया एशिया कपमध्ये संपवते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कॅप्टन धोणी दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार आहे, तर युवराज सिंग आणि सुरेश रैनाचा या टीममध्ये समावेश नाहीये. त्यामुळे मिडल ऑर्डरची चिंता यावेळी टीम इंडियाला भेडसावू शकते, पण धोणीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीला स्वत:ला सिद्ध करण्याची ही एक नामी संधी आहे.

विराट कोहलीने याआधीही झिम्बाब्बे दौर्‍यात टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला होता आणि त्यातच आता या खराब कामगिरीतून टीम इंडियाला तो विजयी मार्गावर परत आणतो का याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल. एकूणच काय, तर पराभवाची मालिका खंडीत करत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन्सच्या थाटात विजय मिळवण्यासाठी एशिया कप टीम इंडियासाठी नामी संधी ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2014 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close