S M L

इचलकरंजीमध्ये यंत्रमाग कारखानदाराचा खून, महिन्याभरातली दुसरी घटना

Samruddha Bhambure | Updated On: Feb 25, 2014 01:03 PM IST

kolhapur serial killers25 फेब्रुवारी :  मँचेस्टरनगरी म्हणून ओळख असणारं कोल्हापूर जिल्ह्यातलं इचलकरंजी शहर रात्री पुन्हा एकदा खुनानं हादरुन गेलं आहे. खंडणीच्या वादातून काल रात्री संजय पाटील या यंत्रमाग कारखानदाराचा अज्ञातांनी खून केला आहे. इचलकरंजी शहरातल्या जुना चंदूर भागात ही हत्या करण्यात आली. कोयता आणि गुप्तीने वार करुन पाटील यांचा खून करण्यात आला असल्याचे समजते.

या प्रकरणामुळे यंत्रमाग कारखानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या 30 तारखेला याच भागात एका यंत्रमाग कारखानदाराचा खून करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा हा खून झाला आहे. दरम्यान पाटील यांच्या कारखान्यातील कामगाराचा या खूनामध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांचा निषेध करण्यासाठी यंत्रमाग धारकांनी आज 12 तासांचा बंद पुकारला आहे. त्यामुळे वस्त्रनगरीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आज ठप्प होण्याची शक्यताय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2014 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close