S M L

बलात्कार प्रकरणी दिलीप वाघ यांच्यावर कारवाई करा :कोर्ट

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2014 04:27 PM IST

Image img_137922_aamdardilipvagh_240x180.jpg25 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोर्‍याचे आमदार दिलीप वाघ बलात्कार प्रकरणी आणखी अडचणीत आले आहे. बलात्कार प्रकरणात ते निर्दोष असल्याचा पोलिसांचा अहवाल कोर्टाने फेटाळलाय आणि या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई पूर्ण करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

25 फेब्रुवारी 2011 ला एका तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून नाशिकच्या सरकारी विश्रामगृहात बोलावण्यात आलं आणि तिथे आमदार दिलीप वाघ आणि त्यांच्या पी ए नं आपल्यावर बलात्कार केला अशी पीडित तरुणीची तक्रार आहे.

दरम्यान, आपल्याला धमकावल्या मुळे आपण ही तक्रार मागे घेतल्याचा जवाब पिडीत मुलीने 18 मार्च 2011 ला नगर पोलिसांना दिला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिलेल्या क्लिन चीटला चॅलेंज देण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2014 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close