S M L

राज्यभरात होळी उत्साहात साजरी

11 मार्च राज्यभरात होळी उत्साहात साजरी करण्यात आली. अपवित्र, अमंगलाची होळी करून नवी सुरुवात करण्याचा हा दिवस असतो. लहान - थोरांपासून सेलिब्रेटींपर्यंत आणि सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकानं होळी धुमधडाक्यात साजरी केली. कोल्हापूर, पुणे या शहरांत भ्रष्टाचार, अराजक, दहशतवादाचा निषेध करण्यासाठी होळ्या पेटल्या. या होळीबरोबर आथिर्क मंदीचं संकटही टळो, अशी प्रार्थना सगळयांनी केली. मुंबईतही होळी उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईत सर्वांचं आकर्षण ठरली ती, वरळीच्या बीडीडी चाळीतली होळी. मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाबच्या प्रतिकृतीचं यात दहन करण्यात आलं. त्याच बरोबर मुंबईतल्या कोळी लोकांनीही आपल्या परंपरागत पध्दतीने होळी उत्सव साजरा केला. वरळीच्या बीडीडी चाळीत अनोखी होळी साजरी झाली. या चाळीत मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाब, याचीच होळी करण्यात आली. त्यासाठी कसाबची चाळीस फूट उंच प्रतिकृती तयार करण्यात आली होती. मुंबई हल्ल्याच्या जखमा मुंबईकर अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे मंुबईकरांनी अजमल कसाबचीच होळी बनवली. कसाबला कोर्ट शिक्षा तर देईलच. पण मुंबईकरांनी आपल्या मनातल्या रागाला या कसाबच्या होळीने शांत करण्याचा प्रयत्न केला. ही होळी रात्री बारा वाजता पेटवण्यात आली. कसाब आणि त्याचे साथीदार ज्या कफ परेडच्या धक्क्यावर पहिल्यांदा उतरले त्या कोळीवाड्यातही होळी साजरी करण्यात आली. मुंबईच्या कोळी लोकांनी आपल्या परंपरागत पध्दतीने होळी साजरी केली. आपल्या मासेमारीच्या व्यावसायाची भरभराट होवो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रभरात होळीची धूम आहे.सोलापुरातील ताड्यावर मात्र बजारा समाज वेगळ्या पध्दतीनं होळी साजरी केली गेली. सामान्यपणे होळी रात्री पेटविली जाते. पण बंजारा समाज मात्र पहाटे सहा वाजता होळी पेटवली जाते. रात्रभर पारंपारिक गीतं गाऊन पु-या तळल्या जातात.पुरूष महीलाना शिवीगाळ करतो आणि महीला त्याना चिडून झोडपतात. हा प्रकार रा़त्रभर चालतो. सकाळी अघोळी करून बजारा बाधव गावाबाहेर एकत्र जमुन वाजत गाजत होळी पेटवितो.होळीची राख एकमेकाच्या कपाळी लावून जेष्ठांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. होळी पेटवतानाही वाजतगाजत बजारी भाषेत गीतं गायली गेली.या गीताच्या माध्यमातून होळीला विनंती केली गेली की - हे होळी माता तू एक दिवस येतेस त्यामुळे मी तुझी सेवा करू शकलो नाही कृपा करून तू जास्त दिवस ये मी तुझी चागली सेवा करीन.आज दिवसभर होळी निमित्त तांड्यावर वेगवेगळी पारंपारिक उत्सव याजरा केला जातो. अकोल्यात झुंज संघटनेचे कार्यकर्ते होळी जरा अनोख्या ढंगात साजरी करतायत. होळीच्या निमित्तानं पांढरे केस झालेल्या वयोवृद्धांना हेअर डाय करून दिलं जातंय. रस्त्यावरून जाणार्‍या पांढर्‍या केसांच्या लोकांना गुलालाचा टिळा लावला जातो. आणि त्यांना खुर्चीवर बसवून डोक्याचे केस काळे केले जातात. याचं कारण आहे की त्यांनी आपलं वय विसरून म्हणावं "अभी तो मै जवान हूँ..."

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2009 03:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2009 03:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close