S M L

विदर्भाच्या सिंचनाचे 1,402 कोटी परत करा -राज्यपाल

Samruddha Bhambure | Updated On: Feb 26, 2014 03:40 PM IST

Image img_232612_kshankarnaryan_240x180.jpg26 फेब्रुवारी : सिंचन घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या सरकारला राज्याचे राज्यपाल के. शंकरनारायण यांनी सणसणीत चपराक लगावली आहे. विदर्भाच्या सिंचनाचे अन्यत्र वळवलेलेे 1402 कोटी रूपये विदर्भाला परत करा, असे लेखी निर्देश राज्यपालांनी राज्य सरकारला दिले आहे.

विदर्भ सिंचन महामंडळाच्या तक्रारीनंतर राज्यपालांनी सिंचनाच्या जमा-खर्चाची तपासणी केलीय. तपासणीत राज्यपालांच्या पुर्वपरवानगी शिवाय विदर्भाच्या सिंचनाचे पैसै दुसरीकडे वळवल्याचे उघड झालं. 2008-2012 या काळात विदर्भाच्या सिंचनाचे 1,171 कोटी रूपये पश्चिम महाराष्ट्राकडे, तर 231 कोटी 45 लाख रूपये मराठवाड्याच्या सिंचनासाठी वळवले गेले.

विदर्भ सिंचनाचे एकूण 1,402 कोटी रूपये वळवल्याचा ठपका आहे. अशा प्रकारे पुढच्या 3 वर्षात दरवर्षी 467 कोटी 41 लाख या प्रमाणे सर्व 1402 कोटी रूपये विदर्भ परत करण्याचे निर्देश राज्यपालांनी राज्य सरकारला दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2014 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close