S M L

कुणीही पंतप्रधान होवो पण पहाट झाली पाहिजे -नाना पाटेकर

Sachin Salve | Updated On: Feb 26, 2014 06:37 PM IST

कुणीही पंतप्रधान होवो पण पहाट झाली पाहिजे -नाना पाटेकर

nana patekar news26 फेब्रुवारी : नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्यापैकी कुणीही पंतप्रधान झालं तरी चालेल पण पहाट झाली पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी काय करता हे महत्वाचे आहे असं परखड मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.

तसंच नाना पाटेकर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. पण ही चर्चा चुकीची असून आपण कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही, असंही नाना पाटेकर यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. निवडणूक लढवण्याची अजून आपली पात्रता नाही, ताकद नाहीय, माझा तो पिंड नाही. माझ्याकडे सशक्त चित्रपट, नाटकांचं माध्यम आहे त्यातून मी माझं काम करतोय त्यामुळे मला राजकारणात उतरण्याची गरज नाही असं नानांनी स्पष्ट केलं.

आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. कारण एका पक्षाची मिरासदारी घेतली तर दुसर्‍याबद्दल बोलण्याचा अधिकार आपण गमावून बसतो ते मला करायचं नाही. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमचं कौतुक आणि चुकला तर बोलण्याचा अधिकार आम्हाला द्यावा असंही नाना म्हणाले. नाना पाटेकर यांनी आम आदमी पार्टीला सल्लावजा टोलाही लगावला. अण्णा हजारे यांचं व्यक्तीमत्व खूप मोठं आहे. अण्णां वडिलधारी व्यक्तीमत्व असून कान धरण्याचा त्यांचा अधिकार आहे. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने निवडणूक लढवावी का ? अस जर कुणी विचारलं तर माझा त्याला नकार आहे. आम आदमी पार्टीनं केवळ चांगलं बोलू नये तर त्यांनी ते करुनही दाखवावं असंही नाना पाटेकर यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2014 06:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close