S M L

निवडणुकीच्या आखाड्यात तिरंगी-चौरंगी लढत

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2014 09:03 PM IST

निवडणुकीच्या आखाड्यात तिरंगी-चौरंगी लढत

ncp aap sena bjp election28 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी आता राज्यात राजकीय गरमागरमी सुरू झाली. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी, भाजप आणि आम आदमी पार्टीने आपली यादी जाहीर केलीय. तर आज (शुक्रवारी) शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर करून आम्ही पण मागे नाही असं सांगत निवडणुकीच्या रंगात गुलाल उधळला आहे.

मात्र याला अपवाद ठरला तो काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षांने आपली यादी अजून गुलदस्त्यातच ठेवली आहे. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि 'आप'ने यादी जाहीर केल्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती रंगणार असल्याचं चित्र आहे. पक्षांनी याद्या लवकर जाहीर झाल्याने प्रचाराला ठिकठिकाणी सुरुवातही झाली आहे.

मुंबईत कशी होणार लढत

 • भाजप - किरीट सोमैया
 • आप - मेधा पाटकर
 • राष्ट्रवादी - संजय दिना पाटील
 • मनसे- उमेदवार अजून जाहीर नाही

देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी मुंबईत निवडणुकीच वातावरण तापायला सुरूवात झालीय. मुंबई उत्तर पूर्वमध्ये तिरंगी लढत रंगणार असल्याचं चित्र आहे. उत्तर पूर्वमध्ये भाजपकडून किरीट सोमय्या मैदानात उतरले आहे. त्यांच्या विरोधात अलीकडेच 'आप'मध्ये दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आव्हान देणार आहे. तर राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील लढत देणार आहे. मागील निवडणुकीच्या वेळी मनसेमुळे किरीट सोमय्यांना फटका बसला होता. आता मेधा पाटकरही रिंगणात उतरल्या आहेत. पण दुसरीकडे मनसेनं आपले पत्ते उघडले नाही. त्यामुळे मनसेकडून उमेदवार कोण येणार याची उत्सुकता कायम आहे. जर मनसेनं तगडा उमेदवार उतरवला तर चौरंगी लढतीची शक्यता आहे.

ठाणे

 • राष्ट्रवादी - संजीव नाईक
 • शिवसेना - राजन विचारे
 • आप - संजीव साने

ठाण्यात तिरंगी लढतीची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते आणि विद्यमान आमदार राजन विचारे यांना मैदानात उतरले आहेत तर आपकडून संजीव साने यांना उमेदवारी देण्यात आलीय. गेल्यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार दिल्याने आणि मनसेमुळे राष्ट्रवादीला फटका बसला होता. आता मात्र विद्यमान आमदार राजन विचारे यांनाच सेनेनं रिंगणात उतरवलंय. त्यामुळे तिरंगी रंगतदार लढतीची शक्यता आहे. संजीव नाईकांना जागा टिकवण्यासाठी सेनेबरोबरच आपसोबतही सामना करावा लागणार आहे. मनसेकडे राजन राजेंनंतर प्रभावी चेहरा नाही.

कल्याण-डोंबिवली

 • राष्ट्रवादी - आनंद परांजपे
 • शिवसेना- डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीत शर्यतच लागली होती. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'पॉवर'फुल्ल खेळी करत सेनेच्या गडावरुन शिवसेनेचे आमदार आनंद परांजपे यांना आपल्या पक्षात खेचून आणले होते. त्यामुळे सेनेच्या गडाला चांगलाच हादरा बसला होता. आता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीने वचन दिल्याप्रमाणे आनंद परांजपेंना उमेदवारी जाहीर केलीय. शिवसेनेनं आपल्या गडाला बसलेल्या हादर्‍याची परतफेड करण्यासाठी परांजपेंच्या विरोधात सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कल्याणच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय.

नागपूर

 • भाजप - नितीन गडकरी
 • आप - अंजली दमानिया

नागपूरमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत निवडणुकाचं मैदान रंगणार आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात 'आप'च्या सदस्या अंजली दमानिया मैदानात उतरल्या आहेत. अंजली दमानिया यांनी गडकरींवर घोटाळ्याचे आरोप केले आहे, त्यामुळे गडकरींची विलास मुत्तेमवारांसोबत आणि अंजली दमानियांची डोकेदुखी वाढवली आहे. गडकरींसाठी 'करो या मरो' अशीच परिस्थिती आहे. विलास मुत्तेमवारांना काँग्रेसचा अंतर्गत विरोध आहे मात्र हायकमांडचा वरदहस्त आहे.

नाशिक

 • राष्ट्रवादी - छगन भुजबळ
 • आप - विजय पांढरे

नाशिक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला. पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे छगन भुजबळ अडचणीत सापडले आहे. दिल्लीतला महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरण असो किंवा बांधकाम विभागातील घोटाळे असो अथवा एमआयटी गैरव्यवहार असो यामुळे भुजबळ गोत्यात आले आहे. त्यांच्याविरोधात आम आदमी पार्टीने सिंचन विभागातील निवृत्त अधिकारी विजय पांढरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भुजबळ विरुद्ध पांढरे असा सामना रंगणार आहे.

बीड

 • भाजप - गोपीनाथ मुंडे
 • आप - नंदू माधव

बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी, शिवसेनेला तगडा उमेदवार अजूनही उभा करता आला नाही. त्यामुळे मुंडेंचा गड शाबूत राहिलं अशी शक्यता आहे. पण त्यांच्या विरोधात आपने धाडस दाखवत अभिनेते नंदू माधव यांनी उमेदवारी दिली आहे. पण बीडबाबत अजून राष्ट्रवादीने पत्ते उघडले नाही त्यामुळे दुसर्‍या यादीत राष्ट्रवादी कोणता उमेदवार देणार यावरच खरी लढत पाहण्यास मिळणार आहे.

राज्यातील इतरही ठिकाणच्या लढती पाहुया

जळगाव

 • राष्ट्रवादी - सतीश पाटील
 • भाजप - ए.टी. नाना पाटील

रावेर

 • राष्ट्रवादी - मनीष जैन
 • भाजप - हरिभाऊ जावळे

बुलडाणा

 • राष्ट्रवादी - कृष्णराव इंगळे
 • शिवसेना - प्रतापराव जाधव

परभणी

 • राष्ट्रवादी - विजय भांबळे
 • शिवसेना- संजय जाधव

दिंडोरी

 • राष्ट्रवादी - डॉ. भारती पवार    
 • भाजप - हरिश्चंद्र चव्हाण

अहमदनगर

 • राष्ट्रवादी - राजीव राजळे
 • भाजप - दिलीप गांधी

भंडारा-गोंदिया

 • राष्ट्रवादी - प्रफुल्ल पटेल
 • भाजप - नाना पटोले
 • आप - प्रशांत मिश्रा
 • बहुजन समाज पक्ष - मोरेश्वर मेश्राम

अमरावती

 • राष्ट्रवादी - नवनीत राणा
 • शिवसेना - आनंदराव अडसूळ
 • आप - भावना वासनिक
 • आरपीआय(गवई गट) - राजेंद्र गवई

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2014 07:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close