S M L

निवडणुकांसाठी काय पण, झोपडपट्टी विधेयक मंजूर

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2014 10:46 PM IST

निवडणुकांसाठी काय पण, झोपडपट्टी विधेयक मंजूर

mumbai slumes28 फेब्रुवारी : निवडणुकांसाठी काय पण म्हणत राज्य सरकारने मतांचा जोगवा मागत 'झोपड्डी'च्या दारावर येऊन उभे राहिले आहे. मुंबईसह राज्यातील 1 जानेवारी 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यासाठी झोपडपट्टी सुधारणा विधेयक आज (शुक्रवारी) विधानसभेत मंजूर करण्यात आलंय.

याचा फायदा मुंबई आणि राज्यातील सुमारे 4 लाख झोपड्यांना होणार आहे. 2004च्या निवडणूक जाहीरनाम्यात 2000 पर्यंतच्या झोपडयांना संरक्षण देण्यात येईल असं आश्वासन आघाडी सरकारने दिलं होतं. पण गेली साडेनऊ वर्ष हा निर्णय प्रलंबित होता.

पण आगामी निवडणुकीत कोणतीही रिस्क नको म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं हे विधेयक मजूर करून घेतलं. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटलाही मंजुरी देण्यात आली आहे. तर नवी मुंबई आणि पनवेलमधील जुन्या घरांना वाढीव एफएसआयही मिळणार आहे.

सरकारचा धडाका

- 1 जानेवारी 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण

- ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी

- नवी मुंबईतल्या जुन्या इमारतींना 4 एफएसआय लागू

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2014 08:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close