S M L

प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Mar 1, 2014 04:18 PM IST

प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचं निधन

01 मार्च : प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचं आज (शनिवारी) सकाळी निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. मूळच्या गोव्याच्या असणार्‍या डहाणूकर यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलं.

ऑईल पेंटिंग्ससोबतच सिरॅमिक, लाकूड आणि फायबरग्लास आणि काचेपासून घडवलेली म्युरल्स ही त्यांची खासियत होती. देश विदेशात प्रफुल्ला डहाणूकर यांच्या चित्रांचे अनेक शोज झाले तर ख्रिस्टीज सारख्या प्रसिद्ध संस्थाद्वारे होणार्‍या लिलावांमध्ये डहाणूकरांच्या चित्रांचाही समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2014 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close