S M L

वेस्ट इंडीजनं इंग्लंडविरुध्दची टेस्ट सीरिज जिंकली

11 मार्चइंग्लंड आणि वेस्ट इंडीज दरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेली टेस्ट मॅच शेवटपर्यंत रंगली. दिनेश रामदिन आणि फिडेल एडवर्ड्सच्या झुंजार प्रयत्नामुळे मॅच अखेर ड्रॉ झाली. पण पाच टेस्टची ही सीरिज वेस्ट इंडीजने एक -शून्यने जिंकली. पाचव्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडने आपली दुसरी इनिंग 237 रन्सवर घोषित केली आणि विडींजला जिंकण्यासाठी चार तासात 240 रन्स करण्याचं आव्हान मिळालं. पण ठराविक अंतरावर त्यांच्या विकेट्स पडत गेल्या.जेम्स अँडरसन आणि ग्रॅम समवॅननी जीव तोडून बॉलिंग करताना प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पण इंग्लंड मॅच जिंकणार असं वाटत असताना रामदिन आणि एडवर्ड्स यांनी पीचवर तळ ठोकत बॅटिंग केली. आणि टीमला पराभवापासून वाचवलं. अखेर विंडीजचा स्कोअर आठ विकेटवर 114 रन्स झाला असताना खेळ थांबवण्यात आला. प्रायरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला तर रामनरेश सारवानला मॅन ऑफ द सीरिज किताबाने गौरवण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2009 05:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2009 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close