S M L

बीड, सांगली, सोलापूरला अवकाळी तडाखा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 4, 2014 03:28 PM IST

बीड, सांगली, सोलापूरला अवकाळी तडाखा

garpith04 मार्च : मराठवाड्यात बीड, सांगली, सोलापूर, वर्ध्या जिल्ह्यांत अनेक भागांत सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिला. जोरदार गारपिटीने काढणीला आलेल्या गहू, ज्वारीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, डाळिंब, द्राक्षे बागांनाही गारपिटीचा फटका बसला आहे, अनेक भागांत आंब्याचा मोहर गळून पडल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्‍यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत.

बीड जिल्ह्यात तुफान गारपीट

बीड जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वार्‍यासह गारांच्या पावसानं झोडपलं. या पावसाबरोबरच वडवणी तालुक्यातील पिंपरखेडामध्ये शेतकरी महिलेच्या अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तिघे या वीज पडल्यानं गंभीर जखमी झाले आहेत. गहू, ज्वारी, ऊस आणि आंबा तसंच द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. परळी, अंबेजोगाई, वडवणी या तीन तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय. तर औरंगाबादमध्येही काल तुफान पाऊस झाला. परभणीमध्येही तुफान गारपीट झाली. मराठवाड्यात ज्वारी, हरभरा, मोसंबीचे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सांगलीत प्रचंड नुकसान

सांगली शहरासह मिरज, आटपाडी, खानापूर तासगाव परिसरात वादळी वार्‍यासह गारपिटीनं झोडपून काढलं. गारपिटीनं सांगलीतील द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ज्वारीच्या पिकाचंही वादळी वार्‍यानं नुकसान झालंय.

सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचा फटका

सोलापूरातल्या सांगोला तालुक्यातील गेरडी परिसरात वादळी- वार्‍यासह गारपीट झालीये. यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान, झालंय. अनेक झाडं कोसळून पडलीयेत.सोलापुरला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलाय. वादळी- वार्‍यासह जोरदार पाऊस पडल्यानं डाळिंब, द्राक्षे, गहू, ज्वारीसह पिकांचं नुकसान झालंय. रब्बी हंगामात शेतकर्‍यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय.

वर्ध्यामध्ये झाडंही उखडून पडली

वर्ध्यामध्ये दोन दिवसांची उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी वादळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावलीये. त्यामुळे शेतातला उभा चणा, गहू, भाजीपाला या पिकांचं मोठं नुकसान झालंय. इतकंच नाही, तर पशू, पक्ष्यांनाही या गारपिटीनं झोडपून काढलंय. रस्त्यांवर झाडंही उखडून पडलीयेत. हजारो हेक्टरमधल्या शेतांमुळे नुकसान झालंय. पण अजूनही शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अधिकारी पुढे आलेले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2014 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close