S M L

मनसेला महायुतीत जागा नाही - संजय राऊत

Samruddha Bhambure | Updated On: Mar 4, 2014 02:22 PM IST

Image sanjay_raut_sena_300x255.jpg04 मार्च :  'महाराष्ट्रात कोणत्या पक्षाबरोबर युती करायची याचा अधिकार भाजपला नसून, मनसे महायुतीमध्ये कोणतीही जागा मिळणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन, आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मनसे महायुतीत प्रवेश करण्याची जोरदार शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'महायुतीत मनसेला अजिबात जागा नाही. महायुतीत कोणाला घ्यायचे, याचे अधिकार भाजपला नाहीत. भाजप कोणाला आमंत्रण देवू शकत नाही. भाजपची इच्छा असेल, तर त्यांनी गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात युतीचे प्रस्ताव ठेवावेत महाराष्ट्रात नाही. 2009 च्या निवडणुकीत मनसेमुळेच आमचे मोठे नुकसान झाले होते, असे आम्ही मानत नाही. मराठी माणसांची मते अजूनही शिवसेनेलाच आहेत. सोमवारी गडकरी वैयक्तिक स्वरूपात राज यांना भेटले असतील, भाजप नेते म्हणून नाही. महाराष्ट्रात महायुतीमध्ये 35 ते 40 जागा मिळविण्याची क्षमता आहे. मनसेची महायुतीमध्ये गरज नाही.''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2014 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close