S M L

पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लिग यांच्यात समझोत्याची शक्याता

12 मार्चनवाझ शरीफ यांच्या लाँगमार्चवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी बैठका घेतायत.या बैठकीला पंतप्रधान गिलानी, पंजाब प्रांताचे राज्यपाल रहमान मलिक हजर राहतील, असं समजतंय. पंजाबमधली राज्यपाल राजवट हटवण्याबद्दलही झरदारींचा विचार सुरू आहे, अशा बातम्या पाकिस्तानी मीडियानं दिल्यायत. पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पीएमएल क्यू या दोन्ही पक्षांनी पंजाब प्रांतातलं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करतेय, अशाही बातम्या पाकिस्तानी मीडियानं दिल्यायत. दरम्यान, नवाझ शरीफ यांनी केलेल्या दोन्ही मागण्या मान्य करण्याचा झरदारींचा विचार आहे, असं अवामी नॅशनल पार्टीचे नेते असफंदयार वली खान यांनी म्हटलंय. शरीफ यांची दुसरी मागणी आहे, पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांच्या फेरनियुक्तीची. राज्यपालांची राजवट उठल्यास त्याची किंमत शरीफ यांनी मोजावी लागणार आहे. इफ्तिकार मोहम्मद चौधरी यांची पुन्हा सरन्यायाधीशदी नियुक्ती करावी, ही मागणी त्यांना सोडून द्यावी लागणार आहे. चौधरी आपल्याविरोधातल्या खटल्यांच्या फायलींची धूळ पुन्हा झटकतील, अशी भीती झरदारी यांच्यासह पीपीतल्या अनेकांना आहे. पण बोलणी फिस्कटली तर पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट येण्याची शक्यता अटळ दिसतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2009 04:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2009 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close