S M L

मुंबई बॉम्बस्फोटांना 15 वर्षं पूर्ण

12 मार्च, मुंबई सुधाकर कांबळे12 मार्च 1993 .हा दिवस मुंबईकर कधीही विसरणार नाहीत. एकापाठोपाठ एक 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हत्यारं सापडली होती. या घटनेत 257 व्यक्ती ठार झाल्या होत्या. तर 713 व्यक्ती गंभीर जखमी. बॉम्बस्फोटात झालेलं नुकसान होतं 30 कोटींचं. या घटनेला पंधरा वर्ष पूर्ण झालीत. पण स्फोटातला प्रमुख आरोपी दाऊद इब्राहीम मात्र अजूनही बाहेर आहे.या खटल्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. तसंच कोर्ट सुरक्षेच्या कारणास्तव आर्थर रोड जेलच्या आवारात हालवण्यात आलं. 1994 साली यासाठी विशेष टाडा कोर्ट स्थापन करण्यात आलं. यात एकूण 193 आरोपी होते. त्यात संजय दत्तसुद्धा होता. 2006 साली या खटल्याचं कामकाज संपलं. त्यातल्या 100 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. 100 पैकी 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हा खटला संपला असं अजुनही म्हणता येणार नाही. खटल्यातला प्रमुख आरोपी अजुनही बाहेर आहे आणि तो म्हणजे दाऊद इब्राहीम...त्यानं त्याचं स्मगलिंगचं नेटवर्क वापरून भारतात स्फोटकं पाठवली. या दिवशी शुक्रवार होता म्हणून हा दिवस ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखला जातो.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2009 04:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2009 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close