S M L

शिवसेना - भाजपच्या जागा वाटपाची घोषणा

13 मार्च मुंबईशिवसेना-भाजपनं एक आठवड्याच्या काथ्याकुटानंतर अखेर जागावाटपाची घोषणा केली. कल्याण, भिवंडी, दक्षिण मुंबई आणि यवतमाळ-वाशिम चार जागांवरून शिवसेना -भाजपमध्ये वाद सुरू होता. यावर आता तोडगा निघाला आहे. पण शिवसेनेला हवी असलेली भिवंडीची जागा भाजपकडे गेली आहे. आणि यवतमाळ-वाशिमची भाजपला हवी असलेली जागा शिवसेनेकडे गेलीय. खरंतर यापूर्वी युतीच्या जागावाटपाची घोषणा सेनाभवनमध्ये केली जायची. पण यावेळी मात्र काहीशा अविश्वासाच्या वातावरणातच ही यादी वाचून दाखवल्याची स्थिती होती. दिवसभर जागांवरून घोळ सुरू असताना अचानक दुपारी विनोद तावडे आणि सुभाष देसाई शिवसेनाभवनाच्या बाहेर आले आणि त्यांनी यादी वाचून दाखवली. यानंतर आता भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग मुंबईला येऊन युतीचा पुनरुच्चार करतील, असंही त्यांनी सांगितलं. विनोद तावडे शिवसेना भाजपची युती महाराष्ट्रात एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. लवकरच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंहजी लवकर येणार आहेत. राजनाथ सिंहजी आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिका-यांचा मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यातून प्रचाराचा शुभारंभ होणार होईल, " असं भाजप नेते विनोद तावडे म्हणाले. तर युती आता एकत्रीतपणे प्रचाराला सुरूवात करेल असं शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं. भाजपच्या वाट्याला एकूण 26 जागा आल्या आहेत मुंबई - उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मुंबई.कोकण - भिवंडी, पालघर.पश्चिम महाराष्ट्र - सांगली, सोलापूर, माढा, बारामती, पुणे, अहमदनगर.उत्तर महाराष्ट्र - रावेर, दिंडोरी, जळगाव, धुळे, नंदुरबार.मराठवाडा - लातूर, बीड, जालना, नांदेड.विदर्भ - अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.शिवसेनेला एकूण 22 जागा मिळाल्यायत. मुंबई - दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई.कोकण - ठाणे, कल्याण, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गपश्चिम महाराष्ट्र - सातारा, शिरुर, शिर्डी, कोल्हापूर, हातकणंगले, मावळ उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या वाट्याला नाशिकची जागा आली आहे. मराठवाडा - उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद, हिंगोली विदर्भ - बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, रामटेक, अमरावती शिवसेना-भाजपमध्ये जागांचं विभागवार झालेलं वाटप पुढीलप्रमाणे - मुंबई विभागात शिवसेनेला 3 आणि भाजपला 3 जागा मिळाल्यायत.कोकण विभागात सेनेला 5 आणि भाजपला 2 जागा मिळाल्यायत. पश्चिम महाराष्ट्रात सेनेला 6 जागा तर भाजपलाही 6 जागा मिळाल्यायत. उत्तर महाराष्ट्रात सेनेला एक जागा तर भाजपनं 5 जागा घेतल्यायत. मराठवाड्यात सेनेच्या वाट्याला 4 जागा आल्या आहेत. तर भाजपच्या वाट्यालाही 4 जागा आल्यायत. विदर्भात सेनेला 4 जागा देऊन आणि भाजपनं 6 जागा स्वतःकडे ठेवल्यायत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2009 04:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2009 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close