S M L

महायुती अडकली मुंडे-गडकरी वादात

Samruddha Bhambure | Updated On: Mar 9, 2014 06:19 PM IST

Image img_230052_mundevsgadkari_240x180.jpg09 मार्च :  मुंडे -गडकरी वादामुळे महायुतीत पेच निर्माण झालाय. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात मुंडे-गडकरींनी महायुतीलाच अडचणीत आणलंय.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याच पक्षाच्या विनोद तावडे यांची कोंडी करण्यासाठी आधी शिवसेनेला दुसरा उमेदवार उभा करायला लावला. त्यानंतर महायुतीकडून 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झालं. आता मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या चर्चेनंतर विनोद तावडे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. पण विनोद तावडे यांना दुसरा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवावी लागणार आहे.

याचाच अर्थ त्यांना अकरा मतांची बेगमी करावी लागणार आहे. तसंच शिवसेनेचे दुसरे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकीकडे मुंडे -गडकरी वादात होरपळणार्‍या भाजपला शिवसेनेशीच टक्कर द्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2014 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close