S M L

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात

Samruddha Bhambure | Updated On: Mar 10, 2014 03:50 PM IST

Image img_235422_vidhanbhavan44_240x180.jpg10  मार्च : विधान परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापलाय. 9 जागांसाठी अपेक्षेप्रमाणे 10 उमेदवार रिंगणात उभे राहणार आहेत. पण, 9 व्या जागेवर दावा सांगणार्‍या उमेदवाराला मतांची बेगमी करावी लागणार असल्याने चुरस निर्माण झालीय.

काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत रघुवंशी आणि हरिभाऊ राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले अर्ज भरले. तर भाजपचे उमेदवार पांडुरंग फुंडकर आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनीही आज(सोमवारी) आपले उमेदवारी अर्ज भरले.

आता शेवटपर्यंत 10 उमेदवार जर रिंगणात उभे राहिले तर अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा भाव वधारणार, हे स्पष्ट दिसतंय. परिणामी घोडे बाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांनी आधीच आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे 3 आणि भाजपचे दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. काँग्रेसनं हरिभाऊ राठोड, चंद्रकांत रघुवंशी आणि शिवाजीराव देशमुखांना उमेदवारी दिलीय. एक नजर सर्व पक्षांच्या उमेदवारांवर..

विधान परिषद निवडणूक- 9 जागांसाठी 10 उमेदवार

काँग्रेस

 • - शिवाजीराव देशमुख
 • - चंद्रकांत रघुवंशी
 • - हरिभाऊ राठोड

राष्ट्रवादी काँग्रेस

 • - हेमंत टकले
 • - आनंद ठाकूर
 • - किरण पावसकर

शिवसेना

 • - नीलम गोर्‍हे
 • - राहुल नार्वेकर

भाजप

 • - विनोद तावडे
 • - पांडुरंग फुंडकर

विधान परिषदेची ही निवडणूक रंगतदार कशी आहे ?

 • 9 जागा, 10 उमेदवार
 • 9 व्या जागेसाठी चुरस
 • आघाडीचे 6 उमेदवार निवडून येऊ शकतात
 • शिवसेना- भाजप युतीचे 4 पैकी 3 उमेदवार निवडून येऊ शकतात
 • 9 व्या जागेसाठी विनोद तावडे वि. राहुल नार्वेकर यांच्यात लढतीची शक्यता
 • आघाडीतला एक उमेदवारही अडचणीत येऊ शकतो ?
 • कुणाचा पत्ता कट होणार याची चर्चा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2014 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close