S M L

उद्योगासाठी महाराष्ट्राचा खालून पाचवा नंबर !

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2014 04:34 PM IST

उद्योगासाठी महाराष्ट्राचा खालून पाचवा नंबर !

Maharashtra Industries210 मार्च : राकट देशा, दणकट देशा, महाराष्ट्र देशा असं बिरुद मिरवणार्‍या महाराष्ट्रासाठी नाराजीची बातमी आहे. उद्योगधंद्याच्या पातळीवर देशात महाराष्ट्राचं स्थान घसरतंय हे दाखवणारा एक रिपोर्ट समोर आलाय.

देशाच्या नियोजन खात्याने एका खाजगी यंत्रणेकडून हा पाहणी अहवाल करून घेतला आहे. या अहवालात उद्योगासाठी महाराष्ट्राला खालून पाचव्या क्रमाकांची पसंती दिलीय.

उद्योगासाठी हरयाणा, मध्यप्रदेश, गुजरात,ओरिसा आणि आंध्रप्रदेश या राज्यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. या रिपोर्टनुसार करप्रणाली ,कामगार कायदा, पायाभूत सुविधा, उद्योगांसाठी लागणारी जमीन, बांधकामासाठीच्या परवानग्या आणि पर्यावरणाच्या संबंधित परवानग्या या पातळीवर सर्वेक्षण केलं गेलं.

या सर्वेक्षणानुसार निव्वळ वरची पाच राज्यच नाही तर बिहार, केरळ, राजस्थान आणि तामिळनाडू सुद्धा महाराष्ट्राच्या खूप पुढे आहेत. दरम्यान, आचारसंहिता लागू असल्यामुळे हा रिपोर्ट प्रसिद्ध होणार नाही असं नियोजन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय. नियोजन विभागाने हे सर्वेक्षण डेलोईट टच तोमत्सु नावाच्या कन्स्लटन्सी एजन्सीला करायला दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2014 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close