S M L

राज-गडकरी भेटीवर चर्चा?, पदाधिकार्‍यांसोबत महत्त्वाची बैठक

Samruddha Bhambure | Updated On: Mar 11, 2014 06:35 PM IST

Image img_61332_uddhav_240x180.jpg11 मार्च :  शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होते आहे.

या बैठकीकडे राजकीय अभ्यासकांबरोबरच भाजपचंही लक्ष लागलं आहे. नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे शिवसेना नाराज आहे. त्यानंतर गडकरी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यासाठी गडकरी यांनी शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांना साकडे घातले असून आपण राज यांची भेट महायुतीच्या फायद्यासाठी घेतली आहे असं म्हणटलं आहे.

मनसेनं निवडणूक लढू नये हीच माझी भुमिका होती. पण या भेटीचे राजकीय तर्क वितर्क काढण्यात आले. या भेटीकडे गैरसमजूतीतून पाहू नये, अशी विनंती गडकरींनी शिवसेनेच्या नेत्यांसमोर केली आहे. तसंच आपलं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवावे अशी विनंतीही गडकरी यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना केली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2014 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close