S M L

राज-गडकरींच्या भेटींनंतर शिवसेनेत अस्वस्थता

Samruddha Bhambure | Updated On: Mar 11, 2014 01:35 PM IST

राज-गडकरींच्या भेटींनंतर शिवसेनेत अस्वस्थता

uddhav-thackeray-nitin-gadkari-raj-thackeray11 मार्च :  भाजपा नेत्यांच्या राज भेटीवरून शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून भाजपासोबत युती ठेवायची की नाही, यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी शिवसेना भवनात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या गुप्त बैठकीनंतर निर्णय जाहीर करू, असा सूचक इशारा उद्धवनी भाजपला दिला आहे. त्यामुळेच या बैठकीकडे राजकीय अभ्यासकांबरोबरच भाजपचंही लक्ष लागलंय.

भाजपाने जे दबावाचे राजकारण सुरू केले आहे त्याला उत्तर देण्याची ही शिवसेनेने केलेली खेळी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेच्या मनधरणी करण्यासाठी काही वेळा पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराचाच प्रचार करतील व शिवसेनाच आमचा विश्वासू सहकारी पक्ष असल्याचे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सांगितले.

भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन निवडणूक न लढविण्याचे आवाहन केले होते. पण, राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत, महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार घोषित केले होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये यावरून वाद सुरू झाले होते. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. महायुती यापुढेही अभेद्य राहणार असून, भाजप कार्यकर्ते महायुतीचाच प्रचार करतील, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, राज-गडकरी भेटीसंदर्भात शिवसेनेत नाराजी आहे. आता भाजपकडुन शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत. राजीव प्रताप रुडींच्या मध्यस्थीसाठी राज्य भाजपने प्रयत्न सुरू केले. रूडी हे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची ते भेट घेण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2014 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close