S M L

महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमची घोडदौड सुरूच

14 मार्चऑकलंड वन डेमध्ये पुरुषांची टीम निराशाजनक कामगिरी करत असताना भारतीय महिला टीमने मात्र महिला वर्ल्डकपमध्ये आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. सुपर सिक्सच्या पहिल्या मॅचमध्ये त्यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियन टीमचा 16 रन्सनी पराभव केलाय. भारतीय टीमने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 235 रन्सचं टारगेट ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियन टीम निर्धारित 50ओव्हर्समध्ये 7 विकेटवर 219 रन्स करू शकली. भारताच्या नियोजनबद्ध बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियन बॅटिंग लाईन अप कोसळली. ठराविक अंतराने त्यांचे खेळाडू आऊट झाले. ओपनर ब्लॅकवेलच्या 54 रन्सचा अपवाद वगळता इतर कोणीही फारसे रन्स करू शकलं नाही. भारतातर्फे गोहर सुलताना आणि रिमा मल्होत्राने दोन विकेट्स घेतल्या. तर झुलन आणि रुमेली धरने प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली. त्यापूर्वी भारतीय टीमने ओपनर अंजूम चोप्राच्या 76 आणि मिताली राजच्या 46 रन्सच्या जोरावर 234 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2009 07:20 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2009 07:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close