S M L

10 हजार भरा केजरीवालांसोबत जेवण करा !

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2014 09:44 PM IST

10 हजार भरा केजरीवालांसोबत जेवण करा !

denar kejriwal11 मार्च : लोकसभा निवडणुकीत मतदारराजाला खुश करण्यासाठी आम आदमी पार्टीने नामी शक्कल लढवली आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या 13 तारखेपासून होणार्‍या विदर्भ दौर्‍यानिमित्त 'डिनर विथ केजरीवाल' हा निधी संकलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

10 हजार रुपये भरून अरविंद केजरीवाल यांच्यासह जेवण करता येणार आहे. हॉटेल टूली इंटरनॅशनल इथं 14 मार्च रोजी 150 जणांची केजरीवाल यांच्यासोबत भोजनाची व्यवस्था करण्यात आलीये.

आम आदमी पार्टी भ्रष्ट कॉर्पोरेटकडून निधी घेत नाही तर अशा चांगल्या मार्गाने निवडणुकीसाठी निधी जमवत असल्याचं आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे या अगोदर भाजपने 'नोट फॉर व्होट' असं अभियान राबवलं होतं. त्याच धर्तीवर आपने एक पाऊल पुढे टाकत थेट 'डिनर विथ केजरीवाल' निधी संकलन कार्यक्रम हाती घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2014 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close