S M L

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल मुंबईत दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Mar 12, 2014 07:34 PM IST

kejriwal_druing_campaign12 मार्च :  देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारसभांचा धडाका लावला अस्तानाचं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आज मुंबईत दाखल होणार आहेत.

ते सकाळी 10.30 च्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झालेत. यावेळी त्यांचं खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यानंतर केजरीवाल यांच्या मुंबई दौर्‍याला अतिशय 'आम' पध्दतीनं सुरूवात होणार आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर अरविंद केजरीवाल रिक्षानं अंधेरी स्टेशनकडे जाणार असुन 11च्या सुमारास लोकलने चर्चगेट कडे जाणार आहेत. आज मुंबई दौर्‍यात संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोचं आयोजनही करण्यात आलं आहे.

राज्यात एकीकडे अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असताना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष प्रचारसभा घेण्यात मग्न असल्याचे चित्र आहे.

आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर अरविंद केजरीवाल हे पहील्यांदाच महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. त्यामुळे केजरीवाल यांच्या मुंबई दौर्‍यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. दिल्लीचे राजकारण हलवणार्‍या केजरीवालांकडे महाराष्ट्रातल्या सर्व बड्या नेत्यांच तसचं गुजरातमधील प्रचार दौर्‍यात मोदी आडवे आल्यानंतर केजरीवाल आजच्या सभेत कोणाचा समाचार घेणार, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2014 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close