S M L

न्यूझीलंडने पाचवी वनडे जिंकली

14 मार्च ऑकलंडऑकलंड वन डेमध्ये न्यूझीलंडने भारतीय टीमचा 8 विकेट्स राखून पराभव केलाय. भारताने विजयासाठी दिलेलं 150 रन्सचं टारगेट त्यांनी 23व्या ओव्हरमध्येच पार केलं. ज्या पीचवर भारतीय टीमची बॅटिंग कोसळली.त्याच पीचवर रायडर आणि मार्टिन गपटिल यांनी रन्स लुटले.दोघांनी तडाखेबाज हाफ सेंच्युरी केली. रायडरने 49 बॉल्समध्ये 63 रन्स करताना 4 सिक्स मारले. तर गपटिल 57 रन्सवर नॉटआऊट राहिला. भारतातर्फे प्रवीणकुमार आणि ईशांत शर्मा यांनी 1-1 विकेट घेतल्या. त्यापूर्वी, टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय टॉप ऑर्डर मात्र कोसळली. आठव्याच ओव्हरमध्ये गौतम गंभीर आऊट झाला. आणि त्यानंतर ठराविक अंतराने बॅट्समन आऊट होत गेले. सेहवागने 40, रैना 8, युवराज सिंग 11, धोणी 9 तर युसुफ पठाण शून्य रन्सवर आऊट झाले. न्यूझीलंडतर्फे रायडरने 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच किताबाने गौरवण्यात आलं. भारतीय टीमने ही सीरिज 3-1 ने जिंकली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2009 06:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2009 06:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close