S M L

आयपीएलच्या तारखाचा घोळ कायम

14 मार्च दिल्लीआयपीलएलने सादर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार सामने खेळवणं शक्य नसल्यामुळे गृह मंत्रालयानं आयपीएलच्या दुस-या सिझनचं वेळापत्रक नव्यानं मागवलं आहे. दुसरीकडे अजूनही आंतरराष्ट्रीय खेळाडू आयपीएलमधील सहभागावर साशंक असल्याची चर्चा आहे.पण असं जरी असलं तरीही आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला आणि संबंधित अधिका-याला टॉप क्लास सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येईल अशी ग्वाही ललित मोदींनी दिली आहे.लाहोरमध्ये पाकिस्तान दौ-यावर गेलेल्या श्रीलंकन टीमवर दहशतवादी हल्ला झाला आणि दहशतवादाचा एक नवीन चेहरा सगळ्या जगासमोर आला. दहशतवादाचा थेट फटका यावेळी क्रिकेटला बसलाय. या हल्ल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचं भवितव्य तर धोक्यात आलचं आहे. पण त्याचबरोबर त्याचे पडसाद जागतिक क्रिकेटवरसुद्धा उमटलेत. विशेषता भारतीय उपखंड क्रिकेट खेळण्यासाठी असुरक्षित असल्याचं चित्र आता जगासमोर उभ राहिलयं. इतकचं नाही तर या दहशतवादाचा फटका आयपीएललाही सहन करावा लागत आहे. मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि इंग्लंड दरम्यान चेन्नईला सीरिज खेळवली गेली. आणि या दौ-यात क्रिकेटर्सना कधीही मिळालं नव्हतं इतकं संरक्षण मिळालं. भारतीय खेळाडूंना अशा सुरक्षेची सवय आहे पण इंग्लंडच्या खेळाडूंसाठी त्यावेळी हे नवीनचं होतं.मुंबई हल्ल्यानंतर क्रिकेटपटूंसाठी खरोखरीचं ही एक अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था होती असं इंग्लडच्या खेळाडूंनी सांगितलं होतं. इंग्लंडच्या टीमला देण्यात आलेल्या सुरक्षेसारखीच सुरक्षा आयपीएलसाठीही देण्यात येईल असं ललित मोदींनी जाहीर केलं आहे.एकूणच आयपीएलचा हा हंगाम सर्व खेळाडूंना बंदुकीच्या सोबतच घालवावा लागणार आहे हे मात्र नक्की.आयोजकांनी सादर केलेलं नवं वेळापत्रकही काही राज्यातल्या पोलिसांना मान्य नाही. यावर तोडगा काढण्यासाठी गृहमंत्रालायची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली.या बैठकीला गृहमंत्री पी. चिदंबरम, गृहसचिव मधुकर गुप्ता, गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि गृह खात्याचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर 7 राज्यांचे पोलिस महासंचालकही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.या बैठकीत झालेल्या चर्चेत काही राज्यांनी निवडणुकी दरम्यान आयपीएल मॅचसाठी सुरक्षा पुरवायला असमर्थता दर्शवली. तर काही राज्यांनी नव्या वेळापत्रकाला कोणतीही हरकत घेतली नाही. महाराष्ट्रानंही स्पर्धेला आवश्यक ती सर्व सुरक्षा पुरविणार असल्याचंही स्पष्ट केलं. पण सुरक्षेचा ताण काहीप्रमाणात कमी करण्यासाठी गृह मंत्रालयाने मॅचच्या काही तारखा बदलण्याची विनंती आयपीएल आयोजकांना केली आहे. आणि त्यांनी ही मान्य करत वेळापत्रकात बदल करण्याची तयारी दर्शवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2009 10:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2009 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close