S M L

यादवांच्या राजीनाम्याच्या मागणीवर वारकरी ठाम

16 मार्च संतसूर्य तुकाराम या कांदबरीचा वाद सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत. या कादंबरीच्या वादावरून रविवारी वारक-यांनी साहित्यिक आनंद यादव यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आनंद यादव यांनी देहूत जाऊन वारक-यांची पुन्हा माफी मागितली. तसंच वारकरी आणि संत तुकाराम भक्तांची माफी मागत, लेखी माफीनामाही देहूतल्या संत तुकारामाच्या चरणी अर्पण केला. तरीही वारकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आनंद यादव यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी या वारक-यांची मागणी आहे.यावेळी आनंद यादव यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर बोलणं मात्र टाळलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2009 04:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2009 04:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close