S M L

मदत मिळणार कधी , शेतकर्‍यांचा आर्त सवाल

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2014 03:27 PM IST

मदत मिळणार कधी , शेतकर्‍यांचा आर्त सवाल

farmmer16 मार्च :  अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या मराठवाड्यातला शेतकरी हतबल झाला आहे. शनिवारी दिवसभरात जळगाव जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. तर नाशिक जिल्ह्यात आणखीन एकाचा बळी गेला आहे.

अंमळनेरच्या जैतपिर गावात पती- पत्नीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली तर जामनेरच्या नेरी गावच्या शेतकर्‍यानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या नातेवाईकांचा दावा आहे की गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानामुळेच त्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

अंमळनेरच्या मधुकर पाटील आणि त्यांच्या पत्नीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली . अवकाळी पावसानं त्यांच्या शेतातील कापूस आणि मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्याच निराशेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा भावाचा दावा आहे. त्यांच्या अनाथ झालेल्या दोन लहानग्यांना आणि वृद्ध आईला सरकारनं मदत करावी अशीही विनंती त्यांनी आयबीएन लोकमततर्फे सरकारकडे केली आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या दरेगावातली आत्माराम पवार या शेतकर्‍याची आत्महत्या केली. गारपीटामुळं झालेल्या शेतीच्या नुकसानामुळे आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या सांतुका गारोळे या शेतकर्‍यानं विष घेवून आत्महत्या केलीये चर लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ येथील भागवत माने या शेतकर्‍यानंही विष घेऊन आपलं आयुष्य संपवलं. दुसरीकडे बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यातील महादेव शेळके या अवघ्या वीस वर्षांच्या शेतकर्‍यानंही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या बालाजी बागल या शेतकर्‍याचं ज्वारीचे अतोनात नुकसान झाल्यामुळे निराशातून बागल यांनी आपला जीव संपवला.

दरम्यान, गारपिटीने उद्‌ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू झालं आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांबरोबरच विरोधकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. 'आत्महत्यांनी प्रश्न सुटत नाहीत, तर वाढतात, त्यामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नयेत' असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे.

कंदरीत मराठवाड्यात झालेल्या गारपीठीने शेतकर्‍यांचं जबरदस्त नूकसान झालं आहे. पिकांच्या भरवश्यावर शेतकर्‍यांनी अनेक योजना आखल्या होत्या मात्र एका रात्रीतून शेतीमधील पीक गारपीठीनं होत्याचं नव्हते झाले. मराठवाड्याती शेतकर्‍यांच्या भविष्यातील योजना गारपीठीनं उध्वस्त झाल्यानं आता शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवायला सुरवात केली. आता तरी प्रशासकीय सोपस्कर बाजूला ठेवून लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या हातात मदत पोहचली पाहिजे नाहीतर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढत जाईल. 

¿Ö×®Ö¾ÖÖ¸üß ×¦ü¾ÖÃÖ³Ö¸üÖŸÖ äÖôûÝÖÖ¾Ö ×äÖ»ÊÖŸÖᯙ ŸÖß®Ö ¿ÖêŸÖÛú·ñÖÖÓ®Öß †ÖŸ´ÖÆüŸñÖÖ Ûêú»ñÖÖ. †Ó´Öôû®Öê¸üáñÖÖ äÖîŸÖׯָü ÝÖÖ¾ÖÖŸÖ ¯ÖŸÖß- ¯ÖŸ®Öß®ÖÓ ×¾Ö×Æü¸üßŸÖ ˆ›üß ÁÖê‰ú®Ö †ÖŸ´ÖÆüŸñÖÖ Ûêú»Öß ŸÖ¸ü äÖÖ´Ö®Öê¸üáñÖÖ ®Öê¸üß ÝÖÖ¾ÖáñÖÖ ¿ÖêŸÖÛú·ñÖÖ®ÖÓ ÝÖôû±úÖÃÖ ÁÖê‰ú®Ö †ÖñÖãÂñÖ ÃÖÓ¯Ö¾Ö»ÖÓ. ñÖÖ †ÖŸ´ÖÆüŸñÖÖÝÖÏÃŸÖ ¿ÖêŸÖÛú·ñÖÖÓáñÖÖ ®ÖÖŸÖê¾ÖÖ‡ÔÛúÖÓáÖÖ ¦üÖ¾ÖÖ †ÖÆêü Ûúß ÝÖÖ¸üׯ֙üß®ÖÓ †Ö×ÞÖ †¾ÖÛúÖôûß ¯ÖÖ¾ÖÃÖÖ®ÖÓ ðÖÖ»Öê»ñÖÖ ®ÖãÛúÃÖÖ®ÖÖ´ÖãôêûáÖ ŸñÖÖÓ®Öß †ÖŸ´ÖÆüŸñÖÖ Ûêú»ñÖÖ †ÖÆêüŸÖ. †Ó´Öôû®Öê¸üáñÖÖ ´Ö¬ÖãüÛú¸ü ¯ÖÖ™üᯙ †Ö×ÞÖ ŸñÖÖÓáñÖÖ ¯ÖŸ®Öß®ÖÓ ×¾Ö×Æü¸üßŸÖ ˆ›üß ÁÖê‰ú®Ö †ÖŸ´ÖÆüŸñÖÖ Ûêú»Öß . †¾ÖÛúÖôûß ¯ÖÖ¾ÖÃÖÖ®ÖÓ ŸñÖÖÓáñÖÖ ¿ÖêŸÖÖŸÖᯙ ÛúÖ¯ÖæÃÖ †Ö×ÞÖ ´ÖŒñÖÖáÖÓ ´ÖÖêšü¶Ö ¯ÖÏ´ÖÖÞÖÖŸÖ ®ÖãÛúÃÖÖ®Ö ðÖÖ»ÖÓñÖ, ŸñÖÖáÖ ×®Ö¸üÖ¿ÖêŸÖæ®Ö ŸñÖÖÓ®Öß †ÖŸ´ÖÆüŸñÖÖ Ûêú»ñÖÖáÖÖ ³ÖÖ¾ÖÖáÖÖ ¦üÖ¾ÖÖ †ÖÆêü. ŸñÖÖÓáñÖÖ †®ÖÖ£Ö ðÖÖ»Öê»ñÖÖ ¦üÖê®Ö »ÖÆüÖ®ÖÝñÖÖÓ®ÖÖ †Ö×ÞÖ ¾Öé¨ü †Ö‡Ô»ÖÖ ÃÖ¸üÛúÖ¸ü®ÖÓ ´Ö¦üŸÖ Ûú¸üÖ¾Öß †¿ÖßÆüß ×¾Ö®ÖÓŸÖß ŸñÖÖÓ®Öß †ÖñÖ²Öß‹®Ö »ÖÖêÛú´ÖŸÖŸÖ±ìú ÃÖ¸üÛúÖ¸üÛú›êü Ûêú»ÖßñÖê.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2014 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close