S M L

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोदींना आव्हान

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2014 06:30 PM IST

Image cm_on_del_back56346_300x255.jpg16 मार्च :   मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे. 'माझी मोदींशी कधीही आणि कुठेही चर्चा करण्याची तयारी आहे', असं चव्हाण म्हणाले. IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींना आव्हान दिले आहे.

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या खूप पुढे आहे. मोदींची गुजरातमध्ये काय केलंय, ते सर्व जगाला माहितीय.असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. गुजरातच्या विकासाबाबत मोदी जे दावे करतात, त्यावर जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं.

'मनसेची राजकारणाची दिशा ठरलेली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मनसेनं शिवसेनेला आव्हान दिले असून मनसेला निवडणुकीपासून आता पळ काढता येणार नाही', असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्रींचं आव्हान

मराठवाडा, विदर्भ येथे गारपिटीचे अस्मानी संकट कोसळल्याने कार्यकर्त्यांनी माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सोमवारी (१७ मार्चरोजी) वाढदविस असून वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी केली जाते. तसेच विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. मात्र यंदा राज्यातील अनेक भागांना गारपिटीने झोडपले असून यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गारपिटीने झालेल्या नुकसानामुळे हवालदील झालेल्या मराठवाड्यातील चार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. राज्यावर संकट कोसळले असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करु नये असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्रींचा खुलासा

तसंचं गारपिटीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना सरकारकडून मदत जारी केली असून, आता शेतीच्या नुकसानीच्या मदतीसाठी घेण्यात येतेय निवडणूक आयोगाची परवानगी, असं खुलासा देखील मुख्यमंत्र्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2014 06:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close