S M L

विजयकुमार गावित मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2014 09:47 PM IST

Image img_231082_gavit34_240x180.jpg17 मार्च : डॉ. विजयकुमार गावित मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हिना गावित भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

डॉ. हिना गावित विजयकुमार गावितांची मुलगी आहे. गावित यांची मुलगी हिना गावित ह्या नंदुरबार लोकसभेसाठी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या पहिल्या यादीत हिना गावित यांचं नाव जाहीरही झालं होतं. पण काही कारणास्तव ते मागे घेण्यात आलं.

हिना गावित जर भाजपकडून निवडणूक लढवणार असतील तर विजयकुमार गावित यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. याविषयीचा निर्णय त्यांनी भाजपला कळवणं अपेक्षित आहे. तर विजयकुमार गावित मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार झाले असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांकडून मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2014 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close