S M L

विमान बेपत्ता होण्यामागे पायलटचा हात?

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2014 07:07 PM IST

मलेशियन एअऱलाईन्स

मलेशियन एअऱलाईन्स

17 मार्च : बेपत्ता झालेल्या मलेशिया एअरलाईन्सचं 'एमएच370' विमानाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. विमानातील यंत्रणा निकामी झाल्याचा सिग्नल दिल्यानंतर पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलशी बोलला होता, अशी माहिती पुढे येतेय. त्यावेळी हा पायलट कोणत्याही बिघाडाबद्दल बोलला नव्हता.

त्यामुळे विमान बेपत्ता होण्यामागे या पायलटचा हात असावा असा संशय बळकट झालाय. त्याबरोबरच विमानाचं अपहरण झाल्याची शंकाही वाढत चालली आहे. मलेशियाच्या पंतप्रधानांनी आधीच ही भीती व्यक्त केलीये. तसंच हे विमान तीन देशांवरुन उडालं असल्याची शक्यता व्यक्त होतं आहे.

मागील एक आठवड्यापासून मलेशियन एअरलाईन्सचं 'एमएच 370' या विमानाचा शोध घेतला जात आहे. या विमानात 239 प्रवाशी आहे. या विमानाच्या शोधासाठी 14 देशाचे 18 विमान आणि 43 जहाजांची फौज विमानाच्या मागावर आहे पण अजूनही विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. चीन, मलेशिया, व्हिएतनामाजवळच्या समुद्रात विमानाचा शोध घेतला पण हाती काही लागले. अ

खेर हताश झालेल्या मलेशियन सरकारने विमानाचं अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त केलीय. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनी सांगितल्यानुसार, विमान मलेशियाच्या पूर्व किनार्‍यावर पोहचल्यानंतर विमानाची संचार यंत्राणा मुद्दामहुन बंद करण्यात आली. त्यानंतर रडारवर मिळालेल्या माहितीनुसार ट्रान्सपॉन्डर बंद केल्यानंतर विमानाने पहिले पश्चिमेकडे वळले आणि त्यानंतर पूर्व-पश्चिम दिशेकडे कूच केली. आणि हे सगळं विमानातील बसलेली व्यक्तीच करू शकते.

विमानाचा संपर्क तुटल्यानंतर 7.5 तास विमान हवेत होते. या विमानाचा शोध कजाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या सीमारेषेवर आणि इंडोनेशियापासून हिंदी महासागरापर्यंत शोध घेतला जात आहे असं मलेशियन सराकारने सांगितलं. चीनच्या समुद्रात विमानाचा शोध घेणं थांबवण्यात आलं असून हिंद महासागर आणि अंदमान द्वीपजवळ याचा शोध घेतला जात आहे. यासाठी भारतीय नौसेनेची मदतही घेण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2014 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close