S M L

कोल्हापुरच्या आखाड्यात कालचे मित्र आजचे शत्रू !

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2014 07:14 PM IST

कोल्हापुरच्या आखाड्यात कालचे मित्र आजचे शत्रू !

kolhapur_mandlike vs mahadikसंदीप राजगोळकर, कोल्हापूर

17 मार्च : राजकारणात बदल हा काही नवा नसतो. त्याचंच प्रत्यंतर सध्या कोल्हापूरच्या निवडणुकीत पाहायला मिळतंय. या मतदारसंघात एकेकाळी एकमेकांचे मित्र म्हणवणारे आज एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. त्यामुळे अनेक नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागलीय.

कोल्हापूर म्हणजे एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला..खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कोल्हापूरची जागा तब्बल 16 वर्ष सांभाळली. मात्र कामगार मंत्री हसन मुश्रीफांच्या निमित्ताने मंडलिक आणि शरद पवारांच्यामध्ये वैर आलं आणि मंडलिकांनी वेगळी चूल मांडली ती 2009 साली...आणि अपक्ष म्हणून इथं निवडणूक जिंकलीही. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचं सहयोगी सदस्यत्व स्विकारत कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र ते अयशस्वी ठरले आणि ही जागा राष्ट्रवादीकडेच राहिली. त्यानंतर मंडलिकांनी आपले पुरोगामी विचार विसरत आपल्या मुलाला म्हणजेच प्रा. संजय मंडलिक यांना महायुतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. पण संजय मंडलिकांना पक्ष बदलूनही आपल्या विजयाची खात्री वाटतेय.

मंडलिकांच्या या निर्णयामुळे आता त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय. मंडलिकांचे एकेकाळचे शिष्य हसन मुश्रीफ यांनी मंडलिकांवर टीका करत त्यांनी फक्त पुत्रप्रेमासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. मंडलिकांविरोधात राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक रिंगणात आहेत. आता ते राष्ट्रवादीचा पुरस्कार करत पक्षाची कामगिरी भरीव असल्याचं सांगत महायुतीचा प्रभाव नसल्याचं म्हणत आहेत.

मंडलिकांच्या महायुतीतल्या उमेदवारीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी प्रयत्न केले. तर दुसरीकडे मंडलिकांचा पाडाव करण्यासाठीच आपली प्रतिष्ठा आता पवारांनी पणाला लावलीय. त्यामुळे ही लढत नक्कीच लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2014 07:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close