S M L

गारपीटग्रस्त शेतकर्‍याला बेदम मारहाण

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2014 11:10 PM IST

गारपीटग्रस्त शेतकर्‍याला बेदम मारहाण

sol ncp news17 मार्च : एकीकडे गारपिटीने शेतकरी उद्‌ध्वस्त झालेला असताना दुसरीकडे राजकीय नेते मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याच्या प्रयत्न करत आहेत. सोलापुरातल्या मोहोळमध्ये गारपिटीचा पंचनामा करण्यासाठी पैसे न दिल्याने एका शेतकर्‍याला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय.

सुरेश गुंड असं या शेतकर्‍याचं नाव आहे. या प्रकरणी मोहोळच्या पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या मुलगा विजयराज डोंगरे यांच्या चिथावणीमुळे आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप या शेतकर्‍याने केलाय.

मोहोळमध्ये गारपिटीने शेतकर्‍यांचं खूपच नुकसान झालंय, त्यामुळे गावागावात पंचनाम्यासाठी शेतकर्‍यांची झुंबड उडतीये. या परिस्थितीचा फायदा उडवण्याची शक्कल लढवत शेटफळमध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि विजयराज डोंगरे यांनी पंचनाम्यापोटी 500 रुपयांची मागणी केली. सुरेश गुंड या तरूण शेतकर्‍यांने आपल्या शेतात झालेले नुकसानाची फोटो आणि कागदपत्र घेऊन गेस्ट हाऊस गाठले. पण तिथे त्यांना पंचनाम्यासाठी 500 रुपये पैसे मागण्यात आले. मात्र सुरेश गुंड यांनी पैसे देण्यास नकार दिला.

अगोदर अस्मानी संकटात त्यात शेती पाण्यात गेली त्यामुळे वरुन पैसे कुठून देणार असं गुंड यांनी विनवणी केली. मात्र आपल्याविरोधात तक्रार करतो म्हणून मनोहर डोंगरे यांच्या मुलगा विजयराज डोंगरे यांनी दुसर्‍या दिवशी सुरेश गुंड यांना वाटेत अडवलं. यावेळी डोंगरे यांच्या सात तेआठ कार्यकर्त्यांनी सुरेश गुंड यांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. कार्यकर्त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन गुंड यांनी पळ काढला. पण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता मारहाण करणार्‍या डोंगरे यांच्या कार्यकर्त्यांनी गावात राहू देणार नाही अशी धमकीही दिलीय. याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमी झालेले सुरेश गुंड यांच्यावर सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2014 11:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close