S M L

पीककर्ज माफीचा निर्णय सरकारचा नाही, बँकांचा - शरद पवार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 18, 2014 02:10 PM IST

sharad pawar318 मार्च :  राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू असताना सरकारला मात्र अजून जाग आली नसल्याचं दिसतंय. गारपीटग्रस्तांची मदत लालफितीत अडकलीय. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात असली तरी शेतकर्‍यांना कर्जमाफ करण्याचा निर्णय सरकारच्या हाती नसून हा निर्णय बँकच घेऊ शकते असे वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी पुण्यात केले आहे.

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडल्यावर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकर्‍यांना पिक कर्ज हे सरकार देत नसून बँक देते. त्यामुळे कर्जमाफ करावे की नाही याचा निर्णय संबंधीत बँकेने घ्यावा असे सांगून शरद पवारांनी कर्जमाफीचा चेंडू बँकांच्या कोर्टात टाकला.

गारपिटीने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांना झोडपले असून महाराष्ट्रातील १६ लाख हेक्टर जमीन तर मध्यप्रदेशमधील २४ लाख हेक्टर जमीन उध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेशमध्ये गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले असून राज्यात या पिकांसह द्राक्ष आणि अन्य फळबागांचेही नुकसान झाले आहे. यात गुंतवणूक जास्त असल्याने राज्यातील शेतकर्‍यांचे मोठ नुकसान झाले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

तसंच गारपिटीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून काय फायदा असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. काही वर्षांपूर्वी सरकारनंच शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली होती. पण आता पवार यासाठी बँकांकडे बोट दाखवत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे.

दरम्यान, गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्यासंदर्भात उद्या (बुधवारी) दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विशेष समितीची बैठक होणार असून या समितीच्या अध्यक्षपदी शरद पवार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2014 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close