S M L

गडकरींच्या रोड शोकडे सेना,आरपीआयने फिरवली पाठ

Sachin Salve | Updated On: Mar 18, 2014 05:40 PM IST

गडकरींच्या रोड शोकडे सेना,आरपीआयने फिरवली पाठ

sena gadkari18 मार्च : भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज (मंगळवारी) रोड शो केला. पण आरपीआय आणि शिवसेनेनं यात भाग घेतला नाही.

महायुतीचा घटक पक्ष आरपीआयला विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे आरपीआयने महायुतीचा प्रचार करणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेेखर सावरबांधे यांनी काही शिवसैनिक नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी गेले नसल्याचं कबूल केलंय. पण निरोप मिळाला नाही, म्हणून शिवसैनिक जाऊ शकले नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तर बहिष्कार मागे घेतल्याचं आरपीआयनं स्पष्ट केलंय.

त्यामुळे नितीन गडकरी यांच्या आजच्या रोड शोदरम्यान आरपीआय आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दिसले नाहीत. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वीच गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यामुळे शिवसेना त्यांच्या चांगलीच नाराज झाली होती. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांच्यावर टीकाही केली होती. या नाराजीचे पडसाद आज गडकरींच्या रोड शोवरही दिसून आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2014 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close