S M L

गारपीटग्रस्तांना तुम्हीही मदत करू शकता !

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2014 05:43 PM IST

गारपीटग्रस्तांना तुम्हीही मदत करू शकता !

help for hail storm victims in maharashtra19 मार्च : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. सोन्यासारखी पिकं जमीनदोस्त झालीय. या नुकसानीमुळे आतापर्यंत 29 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवलीय. गारपीटग्रस्तांसाठी सरकारने चार हजार कोटींचा प्रस्ताव मांडला आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर शेतकर्‍यांना ही मदत मिळेल.

पण समाजानंही आपली जबाबदारी उचलली पाहिजे, गारपीटग्रस्तांना मदतीचा हात दिला पाहिजे. शेतकर्‍यांचं नुकसान तर झालचं आहे, पण, भटक्या विमुक्त जमातीच्या घरांचं नुकसान झालंय. घरांसाठी निवारा हवाय. घरात अन्नधान्यही नाही. पशुधनाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशावेळी तुमच्या माणुसकीला आवाज द्या...तुम्ही पुढील संस्थांना संपर्क साधून मदत करू शकता.

1) TISS

द्वारा, जॅकलीन जोसेफ,

अध्यक्ष, जमशेटजी टाटा सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट

देवनार, मुंबई- 400088

पोस्ट बॉक्स नंबर 8313

चेक - 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' या नावानं द्यावा

 

2) 'अफार्म'

द्वारा, सुभाष तांबोळी,

कार्यकारी संचालक,

2/23, A-B, रायसोनी पार्क, मार्केट यार्ड, पुणे - 411037

ई-मेल : admin@afarm.org

3) 'लोकपर्याय' (भारतीय लोक आणि पर्यावरण विकास संस्था)

त्रिवेणी, बँक ऑफ बडोदाच्या वरचा मजला, समर्थनगर, औरंगाबाद - 431001

4) मानवलोक, विद्यकुंज कॉलनी, पोस्ट बॉक्स नंबर 15, अंबेजोगाई, जिल्हा बीड - 431517

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2014 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close