S M L

राज्यभरात आतापर्यंत 30 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Mar 22, 2014 10:19 PM IST

234marathvada_farmar22 मार्च : राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करूनही गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचा आकडा आता 30 वर पोहचला आहे. आज (शनिवारी) सकाळपासून चार शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवलं.

उस्मानाबादमधल्या कळंब तालुक्यामध्ये रत्नाकर माळी या शेतकर्‍यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ही 7 वी आत्महत्या आहे. जालन्यातही एका गारपीटग्रस्त आणि कर्जबाजारी शेतकर्‍यानं आत्महत्या केली. 40 वर्षांच्या कडूबा सपकाळ यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावातली ही घटना आहे.

जळगाव जिल्ह्यात गेला आठवडा काळा आठवडा ठरलाय. कारण गारपिटीनं उध्वस्त झालेल्या 10 शेतकर्‍यांनी गेल्या 8 दिवसांत आत्महत्या केली आहे. अमळनेर तालुक्यात गलवाडे खुर्द इथल्या अनुसयाबाई पाटील यांनी विहीरीत उडी मारून आपलं जीवन संपवलंय. घरची परिस्थिती हलाखीची, पती गेली 10 वर्ष पॅरेलिसीसनं ग्रस्त आणि त्यातच गारपिटीच्या तडाख्यात शेती उद्धवस्त झाल्यानं त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातल्या बबनराव नायक या शेतकर्‍यानं आज विष पिऊन आत्महत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2014 10:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close