S M L

शक्ती मिल गँगरेप प्रकरणाची उद्या पुन्हा सुनावणी

Sachin Salve | Updated On: Mar 25, 2014 05:12 PM IST

mumbai gang rape3 325 मार्च : शक्ती मिल फोटोजर्नलिस्ट गँगरेप प्रकरणाची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता उद्या बुधवारी दुपारी 3 वाजता होणार आहे. 22 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईतील महालक्ष्मी इथं शक्ती मिलमध्ये एका फोटोजर्नलीस्ट तरुणीवर बलात्कार झाला होता.

या प्रकरणामध्ये 4 आरोपीना दोषी ठरवलं आहे. सरकारी पक्षाने या प्रकरणात 376 इ हे कलम लावलं आहे. त्याविरोधात दोषी ठरलेल्या गुन्हेगारांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात जायचं असल्याने त्यांनी आज कार्टाकडे वेळ मागितली त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

तर टेलिफोन ऑपरेटर सामूहिक बलात्कार प्रकरणातले तीन दोषी याही प्रकरणात दोषी ठरले आहेत. जुलै आणि ऑगस्ट 2013 मध्ये शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेल्या दोन गँगरेप प्रकरणी एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी विजय जाधव, मोहम्मद कासिम हाफिज शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना दोन्ही प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय. त्यामुळे त्यांना सराईत गुन्हेगार मानावं, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. तर या दोन्ही प्रकरणातल्या दोन अल्पवयीन आरोपींचा खटला ज्युवेनाईल कोर्टात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2014 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close