S M L

काँग्रेस राष्ट्रवादीचं 26 -22 वर एकमत

19 मार्च, नवी दिल्ली आशिष दीक्षित काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल दिल्लीत दिली. पण आघाडीची घोषणा होण्याआधी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला पंतप्रधानपदाची भूमिका स्पष्ट करावी लागेल, अशी अटही काँगेसने राष्ट्रवादीला घातली असल्याचं अशोक चव्हाण यांनी दिल्लीत आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलं. नऊ बैठकींनंतर अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जागावाटपाचं तिढा संपण्याची चिन्हं आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 -22 या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं असून त्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. अजूनही एक ते दोन जागांची अदलाबदल करून हा तिढा पूर्णपणे संपवण्यासाठी आज गुरुवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पेटल यांची भेट होणार आहे. " राष्ट्रवादीशी काही विषयांवर आमची बरीचशी पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे. काही गोष्टींबाबत अद्याप स्पष्टता येणं जरुरीचं आहे. त्याबाबत काल दुपारी माझं पवार साहेबांशी बोलणं झालं. त्यांनी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांना दिलेले आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्याशी माझी भेट होणं आवश्यक आहे, " अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. बुधवारी रात्री सोनिया गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानपदाच्या मुद्याला हात घातला. युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहनसिंगच आहेत ही भूमिका सर्व मित्रपक्षांना मान्य करावी लागेल अशी भूमिका त्यांनी मांडली. तसंच या आणि आणखी काही मुद्यांचं स्पष्टीकरण ते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मागणार आहेत. हो- नाही म्हणता म्हणता काँग्रेस - राष्ट्रवादीचं जागा वाटप जवळपास पूर्ण होत आलं आहे. पण काँग्रेसला अजूनही राष्ट्रवादीकडून काही गोष्टींचं स्पष्टीकरण हवं आहे. आघाडी होणार हेे जरी स्पष्ट होत असलं तरी या दोन पक्षांमधल्या विश्वासाला मात्र तडा गेल्याचं चित्रं दिसत आहे.रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना जागा सोडणार असलो तरी समाजवादी पक्ष हा आमच्या आघाडीचा घटक नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे या चर्चेत सांगितलंय. शुक्रवारी म्हणजे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. पण त्याआधी काँग्रेसला पवारांना पंतप्रधान बनवण्यास उत्सुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2009 06:36 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2009 06:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close