S M L

आदिवासी योजना घोटाळ्याचं भूत गावितांच्या मानगुटीवर

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2014 10:00 PM IST

ncp_vijaykumar_gavit27 मार्च : डॉ. विजयकुमार गावित आणि बबनराव पाचपुते अडचणीत येण्याची शक्यता आहे. आदिवासी विकास योजना घोटाळ्याप्रकरणी हे दोघं अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आदिवासी विकास योजना घोटाळाप्रकरणी नेमण्यात आलेल्या जस्टीस गायकवाड आयोगाचे काम एक एप्रिलपासून सुरू होतंय. सहा ते सात हजार कोटींच्या योजनेत हा घोटाळा झाला आहे. त्यामुळे गावित आणि पाचपुते अडचणीत सापडले आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी गावित यांची कन्या हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे गावितांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलीय. तसंच गावित यांचं मंत्रिपदही काढून घेण्यात आलंय. पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर गावित यांच्या मानेवर आदिवासी विकास योजना घोटाळ्याचं भूत मानगुटीवर बसले आहे.

घोटाळ्याचं भूत मानगुटीवर

- 2001 मध्ये पहिली याचिका दाखल

- शासकीय योजनांमध्ये बनावट लाभार्थी

- सरकारी अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

* आदिवासी विकास मंत्री म्हणून

- 2009 पासून याचिका दाखल

- आश्रमशाळांमधील साहित्याची खरेदी

- आदिवासी कल्याणाच्या योजना

- यातील गैरव्यवहार

- सीबआय चौकशी पूर्ण

* वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून

- वैद्यकीय साधनांच्या खरेदीतील

गैरव्यवहराच्या तक्रारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2014 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close