S M L

न्यूझीलंड टेस्टवर भारताची जबरदस्त पकड

20 मार्च, हॅमिल्टनभारत आणि न्यूझीलंड दरम्यान हॅमिल्टन इथे सुरू असलेल्या टेस्टमध्ये भारताने मजबूत पकड बसवली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 241 रन्सची आघाडी मिळवल्यानंतर दुसर्‍या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या तीन विकेट मिळवल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये झहीर खानने इयन मॅकेनटॉशला आऊट केलं. झहीरची ही दोनशेवी टेस्ट विकेट आहे. असा विकेटचा टप्पा ओलांडणारा तो सातवा भारतीय बॉलर आहे. झहीरच्या बॉलिंगवर स्लिपमध्ये हा कॅच पकडताना सचिनच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्याएवेजी मग दिनेश कार्तिकनं फिल्डिंग केली.मॅकेनटोशच्या विकेटनंतर गुपटिल आणि फ्लिन यांनी न्यूझीलंडची इनिंग सावरली. पण टीमचे 68 रन्स झाले असताना हरभजनने ही जोडी फोडली. लागोपाठ मुनाफ पटेलने नाईट वॉचमन काईल मिल्सला आऊट करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. तिसर्‍या दिवस अखेर आता न्यूझीलंडने तीन विकेटवर 75 रन्स केले आहेत. त्यापूर्वी, भारताने पहिल्या इनिंगमध्ये 520 रन्स केले ते सचिनची सेंच्युरी आणि झहीरच्या धडाकेबाज हाफ सेंच्युरीच्या जोरावर सचिनने 160 रन्स करताना करिअरमधली 42वी सेंच्युरी ठोकली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2009 10:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2009 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close