S M L

न्यूझीलंड टेस्टमध्ये सचिनची शानदार सेंच्युरी

20 मार्च, हॅमिल्टनहॅमिल्टन टेस्टचा आजचा दिवस भारतासाठी विशेष महत्त्वाचा ठरला. भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शानदार सेंच्युरी केली. टेस्ट करियरमधली ही त्याची 42वी सेंच्युरी आहे. वन डेत 163 रन्सची शानदार खेळी क्रिकेटप्रेमींच्या मनात ताजी असतानाच न्यूझीलंडच्या धरतीवर सचिननं आणखी एक सेंच्युरी ठोकून क्रिकेटप्रेमींना भेट दिली. न्यूझीलंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये सचिनने अशी शानदार खेळी करत त्याच्या टेस्ट करिअरमधल्या 157व्या सामन्यालाही चार चाँद लावले. जगातल्या प्रत्येक मैदानावर आपल्या कामगिरीची छाप उमटवणार्‍या सचिनची किवीजविरुध्दची ही चौथी सेंच्युरी आहे. तर टेस्ट करियरमधली ही त्याची तब्बल 42वी सेंच्युरी ठरलीये. हॅमिल्टनच्या वेगवान पीचवर सचिननं संयमी खेळी करत 260 बॉलमध्ये 160 रन्स केल्या. ही खेळी खेळताना तब्बल 26 फोरची बरसातही क्रिकेटप्रेमींना पाहयाला मिळाली. या खेळीमुळे भारताला 520 रन्सचा स्कोर उभा करता आला. न्यूझीलंडचा हा दौरा भारतासाठी विशेष महत्त्वाचा ठरलाय. पण त्याचबरोबर सचिन तेंडुलकरची ही शानदार खेळी क्रिकेटप्रेमींसाठी तितकीच अविस्मरणीय ठरली आहे. तिसर्‍या दिवसाच्या शेवटीही भारताची हॅमिल्टन टेस्टवर पकड मजबूत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2009 10:32 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2009 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close