S M L

न्यूझीलंडमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय

21 मार्च, हॅमिल्टन महेंद्र सिंग धोणीच्या भारतीय टीमने न्यूझीलंडमध्ये इतिहास रचला आहे. तब्बल 33 वर्षांनी न्यूझीलंडमध्ये भारतीय टीमनं टेस्ट मॅच जिंकली आहे. हॅमिल्टन टेस्टमध्ये यजमान न्यूझीलंडचा त्यांनी दहा विकेट्स राखून पराभव केला आहे. 241 रन्सनी पिछाडीवर पडल्यावर न्यूझीलंडची दुसरी इनिंग आज 279 रन्समध्येचं आटोपली. त्यानंतर विजयासाठी आवश्यक 39 रन्स भारतीय ओपनर्सनी आरामात केले. त्यापूर्वी, कालच्या तीन विकेटवर 75 रन्सच्या स्कोअरवर न्यूझीलंडने आपली इनिंग आज पुढे सुरू केली. पण ठराविक अंतरावर त्यांच्या विकेट्स गेल्या. न्यूझीलंडतर्फे ब्रँडन मॅक्यूलम आणि ओब्रायननी हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली. मॅक्युलमने तळाला येऊन हाफ सेंच्युरी केली खरी पण न्यूझीलंडचा पराभव तो रोखू शकला नाही... मॅक्युलमनी तब्बल 11 फोर मारत 84 रन्स केले. पण त्याला भक्कम साथ मिळू शकली नाही.भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरलाय तो म्हणजे हरभजन सिंग. हरभजनने28 ओव्हर्समध्ये फक्त 63 रन्स देत तब्बल 6 विकेट घेतल्या. भारतातर्फे राहुल द्रविड आणि गौतम गंभीरनं दुसर्‍या इनिंगची सुरुवात केली आणि न्यूझीलंडचं 39 रन्सचं आव्हान अगदी सहज पार केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2009 05:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2009 05:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close