S M L

साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीही नाराजीचा सूर कायम

21 मार्च, महाबळेश्वर निवडणूक अध्यक्षांचा राजीनामा आणि मावळत्या अध्यक्षांचा नाराजीनामा... वारकर्‍यांची नाराजी... आणि त्यात संमेलनाच्या केंद्रस्थानी गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी कौतिकराव ठाले पाटील, या संमेलनातलं त्यांचं भाषणंही वादग्रस्तच होतं...अशा वाद-विवाद आणि रूसव्या फुगव्याच्या वाताबरणात 82 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस उजाडला. त्यात पहिल्या दिबशी संमेलनाच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सुरांची जादू हीच काय ती या संमेलनातली जमेची बाजू. कवि आणि लेखकांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व सांगताना विचारांना गाण्याची साथ संगत करत रसिकांना जिंकून घेतलं खरं. पण आशाताईच्या गाण्यानंतर अजूनही मूळ वादाच्या चर्चेला जोर धरलाय . परिसंवाद, चर्चासत्र आणि नवोदित कवींचं संमेलन पार पडलं. पण संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीही वातावरणात नाराजीचा सूर कायम होता. साहित्य संमेलनाची भाषणं नेहमीच चर्चेचा विषय ठरतात पण यंदाच्या संमेलनाचा नूरच काही और आहे. अध्यक्षांशिवाय होणार्‍या या संमेलनाचा साहित्यप्रेमींनी निषेध केलाय. त्यात भर म्हणजे वादांच्या पार्श्वभूमीवर सुरू असणार्‍या या संमेलनाच्या स्मरणिकेतही आनंद यादवांचा अनुल्लेख करण्यात आल्यामुळे साहित्यिक आणि वारकर्‍यांमधे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जेष्ठ कवी मधु मंगेश कर्णिक यांनीही याविषयी कडक नापसंती दर्शवलीय.आनंद यादवांच्या नसण्याने संमेलनाचा आत्माच हरवला असल्याची खंत रसिकांच्या मनात आहे. तसंच आपसातील साहित्यिक वाद बाजूला ठेवून साहित्य प्रसार आणि देवाणघेवाणीचा हेतू साध्य करण्यासाठी साहित्य संमेलनात प्रयत्न केले जावेेत असा आग्रह धरण्यात आला आहे. तर 'संतसूर्य तुकाराम' पुस्तकाचे प्रकाशक अनिल मेहता यांना साहित्य महामंडळाच्या काही मंडळीनी धक्काबुक्की करून बैठकीबाहेर काढल्यामुळे मोठा गहजब निर्माण झाला आहे. याप्रसंगी संतप्त झालेले अनेक प्रकाशक एकत्र येऊन याविरूद्ध आवाज उठवण्याची शक्यता असून 'संमेलन या क्षणी गुंडाळा' अशी मागणी मेहता यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2009 05:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2009 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close